समास
मागील भागात आपण संधी पाहिले , संधीवर आधारित असा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत ज्याला 'समास ' असे म्हणतात . माणसाला प्रत्येक गोष्ट वाचवून करायची सवय आहे , मग यात पैसे , वेळ किंवा आपले शब्द प्रत्येक ठिकाणी बचत करतोच . शब्दांच्या बाबती म्हणायचे झाले तर जोडशब्द तयार करून तो आपले शब्द वाचवतो . उदा. सूर्य आणि उदय = सुर्येदय याला संधी म्हणतात , काही वेळातर आपण एक , दोन किंवा अनेक शब्द गाळूनच नवीन शब्द तयार करतो . उदा. पाच वंडांचा समूह = पंचवटी , बटाटा घालून केलेला वडा = बटाटेवडा इत्यादी. समास: सम् +अस् या संस्कृत धातू पासून तयार झाला आहे याचा अर्थ 'एकत्र करणे' असा होतो. असे तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात , तर त्याची फोड केली की त्याला विग्रह म्हणतात. उदा. पोळपाट हा सामासिक शब्द झाला तर पोळीसाठी पाट हा त्याचा विग्रह . समासात किमान दोन शब्द एकत्र येतात , यांना पद असे म्हटले जाते , याच पदां वरून समास ठरत असतो. १)...