समास
मागील भागात आपण संधी पाहिले , संधीवर आधारित असा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत ज्याला 'समास ' असे म्हणतात .
माणसाला प्रत्येक गोष्ट वाचवून करायची सवय आहे , मग यात पैसे , वेळ किंवा आपले शब्द प्रत्येक ठिकाणी बचत करतोच . शब्दांच्या बाबती म्हणायचे झाले तर जोडशब्द तयार करून तो आपले शब्द वाचवतो .
उदा. सूर्य आणि उदय = सुर्येदय
याला संधी म्हणतात , काही वेळातर आपण एक , दोन किंवा अनेक शब्द गाळूनच नवीन शब्द तयार करतो .
उदा. पाच वंडांचा समूह = पंचवटी ,
बटाटा घालून केलेला वडा = बटाटेवडा इत्यादी.
समास: सम् +अस् या संस्कृत धातू पासून तयार झाला आहे याचा अर्थ 'एकत्र करणे' असा होतो.
असे तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात , तर त्याची फोड केली की त्याला विग्रह म्हणतात.
उदा. पोळपाट हा सामासिक शब्द झाला तर पोळीसाठी पाट हा त्याचा विग्रह .
समासात किमान दोन शब्द एकत्र येतात , यांना पद असे म्हटले जाते , याच पदां वरून समास ठरत असतो.
१) पहिले पद महत्त्वाचे असेल तर 'अव्ययीभाव' समास
२) दुसरे पद महत्त्वाचे असेल तर ' तत्पुरुष ' समास
३) दोन्ही पदे महत्त्वाची असतील तर ' द्वंद्व ' समास
४) दोन्ही पदे महत्त्वाची नसली व तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर ' बहूव्रीही ' समास होतो. आता आपण या समासां बाबत विचार करू.
१) अव्ययीभाव : या समासाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा पहिले पद बहुदा अव्यय असूूून ते महत्त्वाचे असते , या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणा सारखा केलेला असतो .
उदा. आजन्म = जन्मापासून , प्रतिक्षण = प्रत्येक क्षणी ,
यथाक्रम = क्रमाप्रमाणे
वर दिलेल्या शब्दात (आ , प्रति , यथा ) हे संस्कृत मधील उपसर्ग आहेत , संस्कृत मधील उपसर्गाना अव्यय मानतात , आणि यातील प्रथम पद महत्त्वाचे यामुळे याला अव्ययीभाव असे म्हणतात.
काही फारसी अव्ययीभाव समासाची उदाहरणे.
बेमालूम , गैरहजर , बिनधोक , हररोज , हरहमेशा .
शब्द मराठीच पण द्विरूक्ती होऊन बनलेले जोडशब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे वापरले जातात काही उदाहरणे.
दारोदार , रात्रंदिवस , दिवसेंदिवस , घरोघर , जागोजाग .
थोडक्यात सांगायचे तर याचे स्वरूप हे क्रियाविशेषण अव्ययाचे असते.
२) तत्पुरुष समास :
या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते आणि महत्त्वाचे म्हणजे अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तीप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो याला तत्पुरुष समास म्हणतात. काही उदाहरणे . महादेव (महान असा देव ) ,कंबरपट्टा ( कंबरेसाठी पट्टा ) , अनिष्ट ( नाही इष्ट ते ) , तोंडपाठ ( तोंडने पाठ )
समानाधिकरण तत्पुरुष : काही वेळा पदे विग्रहाच्या वेळी एकच विभक्ती असते उदा. काळेमांजर ( काळे असे मांजर ).
व्याधिकरण तत्पुरुष : काही वेळा दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात . उदा. देवपूजा ( देवाची पूजा )
उपप्रकार :
क) विभक्ती - तत्पुरुष : शब्दयोगी अव्ययाचा लोप करून पदे जोडली जातात म्हणजेच तत्पुरुष समासात कोणतीही विभक्ती , किंवा तिचा अर्थ लोप करून जोडलेली पदे.
उदा. राजवाडा ( राजाचा वाडा )
तत्पुरुष समासाचे काही उपप्रकार
क) विभक्ती - तत्पुरुष समास :
शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन पदे जोडली जातात. म्हणजेच एका पदाच दुसऱ्या पदाशी असणारा संबंध याच विभक्तीने दाखवला जातो .
समास उदाहरणे
द्वितीय तत्पुरुष देशगत , दुःखप्राप्त ( दुःखाला प्राप्त)
तृतीय तत्पुरुष बुद्धिजड , ईश्वरनिर्मित , तोंडपाठ ( तोंडाने पाठ )
चतुर्थी तत्पुरुष गायरान , व्याहीभोजन , क्रीडांगण ( क्रीडेसाठी अंगण )
पंचमी तत्पुरुष जन्मखोड , जातिभ्रष्ट , सेवानिवृत्त ( सेवेतून निवृत्त )
षष्टी तत्पुरुष राजवाडा , घोडदौड , भूपती ( भूचा पती)
सप्तमी तत्पुरुष स्वर्गवास , घरधंदा , पाणकोंबडा ( पाण्यातील कोंबडा )
ख) अलुक् - तत्पुरुष समास :
अलुक् या शब्दाचा अर्थ होतो लोप ना होणारा.
यावरून ज्या विभक्तीतत्पुरुषात पूर्वपदाच्या विभक्तीप्रत्ययाचा लोप होत नाही याला अलुक् तत्पुरुष असे म्हणतात.
उदा. अग्रेसर , तोंडीलावणे ( तोंड +ई )(तोंडी लावण्याचे)
ग) उपपदतत्पुरुष समास : ( कृदन्त - तत्पुरुष )
दुसरे पद महत्त्वाचे , पण दुसरी पदे ही धातुसाधिते किंवा कृदन्ते असतात , त्यांचा वाक्यात स्वातंत्रपणे उपयोग होत नाही किंवा करता येत नाही.
उदा. पांथस्थ (स्थ = राहणारा ) , शेषशाही ( शाही = निजणारा ) , कामकरी ( करी =करणारा )
घ ) नत्र् तत्पुरुष समास :
( नत्र् = न ) ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते तेथे नत्र् तत्पुरुष समास होतो. या मध्ये पहिली पदे ही ( अ , अन् , न , ना , बे , नि , गैर ) अशी असतात.
उदा. अनादर ( आदर नसलेला ) निरोगी ( रोग नसलेला )
च ) कर्मधारय समास : ज्या तत्पुरुष समासात दोन्ही पदे ही प्रथमा विभक्तीची असतात तेव्ह कर्मधारय समास होतो.
उदा. मुखकमल (मुख हेच कमल) , घनश्याम (घनासारखा श्याम ) लक्षात ठेवण्यासाठीची बाबा म्हणजे पहिले पद हे विशेषण असते तर दुसरे पद नाम.
काही पोटप्रकार पाहूया
अ) विशेषण पूर्वपद : पीतांबर , रक्तचंदन ,निलकमल या शब्दात पहिले पद विशेषण असते.
आ) विशेषण उत्तरपद : पुरुषोत्तम , श्यामसुंदर , वेषांतर या शब्दात दुसरे पद विशेष असते.
इ) विशेषण उभयपद : लालभडक , काळेभोर , पांढराशुभ्र या शब्दात दोन्ही पदे विशेषण असतात .
ई) उपमान पूर्वपद : कमलनयन , चंद्रमुख या शब्दात पहिले पद उपमान असते .
उ) उपमान उत्तरपद : मुखचंद्र , नरसिंह या शब्दात दुसरे पद उपमान असते.
ऊ) रूपक उभयपद : विद्याधन , चरणकमल , काव्यामृत या शब्दात दोन्ही पदे एकरूप असतात .
छ) द्विगू समास :
दुसरे पद महत्त्वाचे हा कर्मधारयाचाच प्रकार आहे , या समासात पहिले पद संख्याविशेषण असते , हा समास नेहमी एक वचनी असतो.
उदा. त्रिदल , पंचवटी , नवरात्र , बारभाई , पंचारती .
ज) माध्यमलोपी समास :
समासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दर्शवणारी मधली पदे लोप पावतात ( किंवा आपण त्यांचा लोप करतो )
उदा. पुरणपोळी (पुरण भरून केलेली पोळी ) , दळवंगे ( वणगेयुक्त डाळ) , लंगोटीमित्र ( लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र ) .
३) द्वंद्व समास :
दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान व समान दर्जाची असतात . 'अथवा , व ,आणि , किंवा ' या उभयान्वयी जोडलेली असतात.
उदा. रामलक्ष्मण (राम आणि लक्ष्मण) , विटीदांडू ( विटी आणि दांडू ) पापपुण्य ( पाप किंवा पुण्य ).
द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात ते पाहू .
क ) इतरेतर द्वंद्व : ज्या समासाचा विग्रह करताना 'आणि , व ' या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग होतो.
उदा. आईबाप (आई आणि बाप) , स्त्रीपुरुष (स्त्री व पुरुष )
ख ) वैकल्पिक द्वंद्व : ज्या समासाचा विग्रह करताना ' अथवा , किंवा , वा ' या विकल्प दर्शक उभयान्वयी अव्ययाचा उपयोग होतो.
उदा. धर्माधर्म ( धर्म किंवा अधर्म ) खरेखोटे ( खरे किंवा खोटे)
ग ) समाहार द्वंद्व : विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश होतो .
उदा. चहापाणी ( चहा , पाणी व फराळाचे इतर पदार्थ ) , भाजीपाला ( भाजी , पाला , कोथिंबीर , कोबी यांचे सारखे इतर पदार्थ ).
बहुव्रीही :
या शव्दाची फोडच ( बहु - भरपूर , पुष्कळ व्रीही - तांदूळ , धान्य )
सामासिक शब्दातील दोन्ही पदे महत्त्वाची नसून या दोन्ही पदांच्या व्यतिरिक्त तिसऱ्याच पदाचा बोध होतो . हा सामासिक शब्द तिसऱ्या पदाचे विशेषण असतो .
उदा. नीलकंठ (निळा आहे कंठ ज्याचा - शंकर)
बहुव्रीही समासाचे मुख्य चार प्रकार पडतात ते पाहू .
अ) विभक्ति बहुव्रीही : विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते . ( ज्याची , ज्याला , ज्याने )
उदा. लक्ष्मीकांत ( लक्ष्मी आहे कांता ज्याची तो ) षष्टी , गजानन (गजाचे आहे आनन ज्याला तो ) चतुर्थी .
विभक्ती बहुव्रीही समासाचे आणखी दोन प्रकार पडतात .
क) समानाधिकरण बहुव्रीही : या समासात दोन्ही पदे एकाच विभक्तीची असतात .
उदा. भक्तप्रिय (भक्त आहे प्रिय ज्याला तो ) चतुर्थी , जितेंद्रिय(जिंकलेली आहेत इंद्रिये ज्याने तो) तृतीय .
ख) व्याधिकरण बहुव्रीही : विग्रह करताना दोन्ही पदांना भिन्न विभक्ती असते .
उदा. चक्रपाणी (चक्र आहे पाणी म्हणजे हातात ज्याच्या तो - विष्णू )
नत्र् बहुव्रीही :
सामासिक शब्दाचे पाहिले पद नकारदर्शक पण समास बहुव्रीही आहे .
उदा. नि:शब्द , अनादी , निरस , अनेक , अनंत .
सहबहुव्रीही :
पहिले पद अव्यय , पण सामासिक शब्द विशेषण असला पाहिजे .
उदा. सनाथ , सफल , सहकुटुंब (कुटुंबाने सहित असा तो)
प्रादि बहुव्रीही :
बहुव्रीही समासाचे पहिले पद जर ' प्र , परा , अप , दूर , सु, वि' अशा उपसर्गानी युक्त असेल.
उदा. निर्धन , दुर्गुण , सुलोचन .
Mast
ReplyDeleteधन्यवाद
DeleteSundar mahiti aahe
ReplyDeleteअनेक धन्यवाद
Deleteअनेक धन्यवाद
Delete