मराठी व्याकरण संधी व त्याचे प्रकार
संधी :- व्याख्या व उदाहरणे. जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात . संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात . संधी म्हणजे एक प्रकारची जोडाक्षरे होय . काही उदाहरणे पाहू . सूर्यास्त = सूर्य + अस्त ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा संधीचे प्रामुख्याने 3(तीन) प्रकार पडतात ते आपण पाहू. १. स्वरसंधी २.व्यंजन संधी ३.विसर्गसंधी प्रथम आपण स्वरसंधी हा प्रकार पाहणार आहोत. स्वरसंधीचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात १.दिर्घत्व संधी २.आदेश संधी आदेश संधीचे पुढे सहा प्रकार पडतात क. गुणदेश संधी ख. वृद्धयादेश संधी ग. यणादेश संधी घ. विशेष आदेश संधी च. पूर्वरूप संधी छ. पररूप संधी १.दिर्घत्व संधी :- सजातीय र्हस्व किंवा दीर्घ स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला दीर्घत्व संधी म्हणतात . काही उदाहरणे. १. वृद...