मराठी निबंध लेखन कसे करावे ?
मागील भागात आपण मराठी निबंध याची व्याख्या व थोडी माहिती घेतली , आज आपण मराठी निबंध प्रकार व त्यांचे लेखन कसे करावे याची माहिती घेणार आहोत. निबंधाला तसा ठराविक साचा नसतो , यात आपण आपल्या मनातले विचार प्रगट करत असतो किंवा आपल्या विचारांना चालना देत असतो . जेव्हा हे विचार आपण कागदावर उतरवतो त्याला निबंध असे म्हणतात. निबंध लेखन आपण करताना चार महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत , ज्याच्या मदतीने आपले लेखन उत्तम होऊ शकेल. १ . निरीक्षण : कोणतीही गोष्ट दिसली की थांबून पहाणे तिचा अनुभव घेणे , बारकावे टिपणे , आपल्या ज्ञानेंद्रियांना त्याची अनुभूती देणे व निरीक्षण नोंदवून ठेवणे. २ . माहिती गोळा करणे : आपणा कडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून वाचन व लेखन , अनुभवी व्यक्ती , श्राव्य व दृक माध्यमे आणि आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक इंटरनेटचे महाजल . ३ . योग्य नोंदी ठेवणे : घटनेची तारीख , वार , जागा , घटना क्रम , का ? कसे ? कोणी ? कधी ? कोणासाठी ? हे प्रश्न विचारावेत इंग्रजीत W / H चे प्रश्न यांच्या नोंदी ठेवाव...