मराठी निबंध लेखन कसे करावे ?

        मागील भागात आपण मराठी निबंध याची व्याख्या व थोडी माहिती घेतली , आज आपण मराठी निबंध प्रकार व त्यांचे लेखन कसे करावे याची माहिती घेणार आहोत.

       निबंधाला तसा ठराविक साचा नसतो , यात आपण आपल्या मनातले विचार प्रगट करत असतो किंवा आपल्या विचारांना चालना देत असतो . जेव्हा हे विचार आपण कागदावर उतरवतो त्याला निबंध असे म्हणतात.

        निबंध लेखन आपण करताना चार महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत , ज्याच्या मदतीने आपले लेखन उत्तम होऊ शकेल. 

१ . निरीक्षण : कोणतीही गोष्ट दिसली की थांबून पहाणे तिचा अनुभव घेणे , बारकावे टिपणे , आपल्या ज्ञानेंद्रियांना त्याची अनुभूती देणे  व निरीक्षण नोंदवून ठेवणे.

२ . माहिती गोळा करणे : आपणा कडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून वाचन व लेखन , अनुभवी व्यक्ती , श्राव्य व दृक माध्यमे आणि आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक इंटरनेटचे महाजल .

३ . योग्य नोंदी ठेवणे : घटनेची तारीख , वार , जागा , घटना क्रम , का ? कसे ? कोणी ? कधी ? कोणासाठी ? हे प्रश्न विचारावेत इंग्रजीत W / H चे प्रश्न यांच्या नोंदी ठेवाव्यात .

४ . आणि मिळालेल्या माहितीचा संग्रह तयार करणे :  आपण जमवलेल्या महिती मिळवली आहे किंवा जमा केली आहे त्यात आपण शिकलेल्या गोष्टी , काव्य पंंक्ती , गाण्याच्या ओळी , सुविचार , म्हणी , अलंकार , सुुभाषितां ओळी , इंग्रजी वाक्य यांचा उपयोग करावा.

निबंध लेखन कसे करावे ? : 

    निबंध लेखनाचे आपणास चार टप्पे करता येतील 

१ . प्रस्तावना : 

   याला आपल्या भाषेत सुरवात असे देखील म्हणता येईल, निबंध कोणताही असो त्याला प्रस्तावना असणे आवश्यक आहे . प्रस्तावना लिहिताना आपण ज्या विषयावर लेखन करणार आहोत त्याबद्दल तसेच त्याठिकाणी आपण कसे ? आणि का ? पोचलो याबाबत सविस्तर माहिती द्यावी , पण प्रस्तावना किती करावी हे लक्षात घेऊन लेखन करणे हे लेखकाचे काम आहे. 

उदाहरण :  आपण लहानपणी 'माझी शाळा' हा निबंध लिहिला असू , यात आपण आपाल्याशी शाळा बोलत आहे असे लेखन केले असावे यावेळी आपण शाळा सरळ आपल्याशी बोलायला लागली असे लिहिले नसते , आपण सुरवातीला मी शाळेत गेलो आमच्या शिक्षकांनी बोलवले होते ... त्याचे कारण ... मग तेथील वातावरण ... मगच शाळा आपले मत आपल्याशी मांडते आणि त्यात देखील आपणच शाळा असे म्हणेल असे मांडतो म्हणजे सदर लेखन आपण प्रथम पुरुष एक वाचनात करतो .विद्यार्थ्यांनी प्रस्तावना पाच ते सहा ओळी करावी.

२ . माहिती : 

       ज्या बाबत आपण लेखन करणार आहोत त्याची संपूर्ण माहिती , त्याचे कार्य , महत्व , त्याचे विचार , इतिहास , भौतिकची परिस्थिती , त्याने केलेले  मार्गक्रमण  आजची परिस्थिती , त्याच्या समस्यां , आपला आणि त्याचा संवाद , तर्कसंगत मुद्दे तुम्हाला आलेला अनुभव , तुमचे विचार यावरील लेखन असावे . यात दोन प्रकार असतात ( विषय प्रवेश , विषयीवस्तार / मुद्दे मांडणी) यात त्याच्या अडचणी व मार्ग याचा देखील उल्लेख व्हावा , संभाषण असेल तर उत्तमच.

उदाहरण :  'वळवाचा पाऊस' हा विषय आपण घेतला तर...

दुपारची तगमग , गडगडाट , धुरळा , पावसाचे वर्णन , मातीचा गंध , आवाज , नुकसान , सर्वांची उडालेली त्रेधातिरपीट , मुलांचा आनंद , 

विद्यार्थ्यांनी दोन ते तीन टप्प्यात म्हणजे जवळपास सव्वा पान लेखन करावे .

३ . शेवट :

       यात आपण मांडलेल्या मुद्द्याचा आढावा असावा , उपदेश असावा , समाज व सामाजिक उद्देशाने प्रेरित असावा तसेच निबंध कोणत्या दिशेला गेला आहे ते देखील यावरूनच कळते 

उदाहरण : 'मी सैनिक बोलतोय'

       आमचे बोलणं पूर्ण झालेच तो पर्यंत गाडीने पुन्हा शिटी वाजवली , तो निघून गेला पण त्याची प्रत्येक गोष्ट माझ्या काळजात  कोरली गेली , त्याचे समर्पण , त्याग , परिवाराची फरफट आणि आमचे सुखी जीवन यांचा विचार करत मी परतलो ....

४ . समाज उपयोगी प्रबोधन :

    समाज उपयोगिता , सामाजिक फायदे , यांनी शेवट करून निबंध समाप्त करावा 

संपूर्ण निबंध दोन ते अडीच पानांचा असावा .

प्रत्येक लेखनात काही प्रमाणात किमान दोन तरी समर्पक वाक्ये , पद्य , गाणी ही असावीत.










   


Comments

  1. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

समास

मराठी भाषा म्हणजे .....

मराठी व्याकरण संधी व त्याचे प्रकार