मराठी निबंध व्याख्या व माहिती
निबंध : =
निबंध या विषयाचे जर थोडक्यात विश्लेषण करायचे झाले तर गद्यलेखनाचा आधुनिक प्रकार असे म्हणता येईल. निबंध याला आपण 'एकत्र बांधणे' 'एकत्र रचणे' असे म्हटले तरी चालेल, आणि या मागचा इतिहास जर आपण पाहिला तर आपणास असे दिसून येत की पूर्वी लेखन भूर्जपत्रांवर केले जात असे आणि यांना एकत्रितपणे बांधून ठेवले जाई या लेखनात एकाच विषयाची माहिती संकलन असे , या रचनेला निबंध असे म्हणतात.
निबंध या आधी टिपणे व नंतर ग्रंथ असे म्हणता येईल , निबंधात आपल्याला आपलेच व समोरच्याचे समाधान करता येईल असे लेखन अपेक्षित आहे किंवा असे लेखन केलेले असावे .
निबंध लेखनातील एक प्रकार धर्मनिबंध यात हिंदू समाजातील लोकांनी कसे वागावे , त्याचा आचार कसा असावा , जर कोणते पाप घडले तर प्रायश्चित्त कसे घ्यावे , आपला व्यवहार कसा असावा या विषयाची माहिती किंवा विवेचन केलेले आपणास दिसून येते. कोणत्याही स्मृतिग्रंथावर केलेले भाष्य किंवा टीका देखील निबंधातच मोडली जाते.
डॉ.पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे यांनी १९६२मध्ये आपल्या "निबंधरचना आणि राष्ट्ररचना" या निबंधात 'तर्कशुद्ध रीतीने केलेली , बुद्धीला आवाहन करणारी , आपले सिध्दांत साधार सप्रमाण मांडणारी , इतिहास , अनुभव , अवलोकन यांच्या पायावर उभारलेली विचारप्रधान रचना' अशी व्याख्या केली . त्यांच्या मते सदर माहिती २० ते २५ पानांची असावी याला निबंध असे म्हणतात.
निबंधाचा मुख्य हेतू विचारांचे प्रवर्तन अथवा विचारांचे प्रतिपादन हा होय. निबंधकार म्हणजे 'जी कोण व्यक्ती एखादा विषय घेऊन अर्थपूर्ण विशद करू शकतो , किंवा तसा प्रयत्न करतो '.
निबंध कोणत्या ना कोणत्या तरी विषयावर आधारित असतो मग तो एखाद्या प्रसंगावर , साहित्यसमीक्षात्मक लेखनावर , सामाजिक , राजकीय , वैज्ञानिक , धार्मिक , ऐतिहासिक , तात्त्विक कोणत्याही विषयावर असू शकतो. सदर लेखनात विनोदी लेख देखील याच प्रकारात मोडतात .
निबंध लेखनात प्रथम मथळा , प्रारंभ , निबंधातील मुद्दे , दाखले , उदाहरणे , भाषेचा वापरातील अलंकारिकता , युक्तिवाद , विनोदी जागा , मांडणी व खंडन या पद्धतीने लेखन असावे .
पुढील भागात आपण निबंधाचे प्रकार यांची माहिती घेणार आहोत.
योगेश सतीश साने
Comments
Post a Comment