मराठी भाषा म्हणजे .....

       भाषा म्हटले की आपल्याला आठवते आपली मायबोली जी मराठी आहे, मग भाषा म्हणजे काय ? भाषा नक्की काय असते ? तर माझ्या मते भाषेचा अर्थच मुळी 'नुसती बोलली जाणारी' असा असावा . करण असे की ,अनेक समाज असे आहेत की ज्यांना बोली भाषा आहे पण त्यांना लिपी नाहीच म्हणजे त्यांच्या भाषेला लिखाण लिपी नाही , तरी देखील त्याला देखील भाषा असेच म्हणता येईल , करण त्यातील साहित्य लेखी स्वरूपात नसले तरी तोंडातून उमटणाऱ्या ध्वनी म्हणजेच तोंडी साहित्यच आहे.

            भाषा जरी एकाच नावाने ओळखली जात असली तरी तिचे स्वरूप हे मात्र विविधता पूर्ण आहे . उदा. जसे आपण मराठी भाषा घेतली तर तिच्या अनेक पोट भाषा आहेत सांगायचे झाले तर कोकणी , वऱ्हाडी , खानदेश , कोल्हापुरी ,मालावणी  हे पोट प्रकार त्या ठिकाणी असणारा भौगोलिक प्रदेश , परिस्थितीत , आजूबाजूला असणारी राज्ये ,असणारे समाज , पंथ यावर अवलंबून असते .

            भाषेच्या अंगी सर्वात महत्वाचा गुण म्हणजे परिवर्तन शिलता याला मराठीत एक सुंदर नाव आहे ' शब्दसिद्धी ' . म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास शब्द कसा सिद्ध झाला (तयार) हे सांगणे होय.आपल्या मराठी भाषेने अनेक भाषा मधील शब्द आपलेसे केले आहेत , त्यात आपल्या भाषेची जणांनी असणारी संस्कृत , हिंदी , तेलगू , कन्नड , गुजराथी व इतर या तरी आपल्या देशातील भाषा आहेत . आपल्या भाषेने परदेशी भाषेतील देखील अनेक  शब्द आपलेसे केले आहेत इंग्रजी , डच , अरेबिक ते कसे ? आणि कोणते ते आपण शब्दसिद्धी या भागात पाहू.

             आपली मराठी भाषा ही भाषिकांच्या संख्येने भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे या आधी क्रमाने हिंदी , तेलगू , बंगाली या आहेत.

              मराठी ही इंडो युरोपियनच्या भारतीय आर्य शाखेची सर्वात दक्षिणेकडील भाषा आहे. आज पर्यंत मराठी या भाषेच्या पोटभाषांचा हवा तसा अभ्यास झालेले नाही , जो अभ्यास आहे तो पुसटसा आहे . सदर भाषेतील व्याकरण , नाद , शब्दसंग्रह यांचा देखील अभ्यास पूर्णपणे झालेला नाही .

           मराठी भाषेचा इतिहास हा परिवर्तनाचा आहे. आपली मराठी ही संस्कृतोद्भव भाषा आहे . मराठीची वेगळे पणाची जाणीव इ.स.१००० च्या आसपास होऊ लागली उदा. इ.स. १११६  मध्ये कोरलेली श्रावनबेळगोळ येथील वाक्ये 'श्रीचावुण्डराजे कारवियलें' . श्रीगंगराजे सुत्ताले '.

                हे झाले एक उदाहरण पण अशी अनेक उदाहरणे आपल्याला मराठी बाबत मिळून येतील ,भूलोकमल्लिलिखित शके १०५१ मधील दोन उतारे 'जेणे रसातळउणु मत्स्येरूपें वेद आणियले मनुशिवक वाणियले तो संसारसायरतरण मोहं ता रवो नारायणु' . जो गोपिजणे गा यिजे बहु परि रूपें निऱ्हांगो ...'

                या अशा मराठीचे स्थूलमानाने तीन टप्पे करता येतील 

       १) प्राचीन कालखंड 

        २) मध्य कालखंड

        ३) अर्वाचीन कालखंड

यानंतरच्या भागात आपण मराठीचा वर्णनात्मक परिचय करून घेणार आहोत.

       

                                          योगेश सतीश साने






             








Comments

Post a Comment

Popular posts from this blog

समास

मराठी व्याकरण संधी व त्याचे प्रकार