याला कोण हो जबाबदार? (बाल मनाचा आचार आणि विचार)

         आजचा लेख लिहायला एक मजेदार कारण घडले या. आज एक पालक पालक सभेसाठी शाळेत आले होते , पालक सभा पार पडली आणि सर्वानीच शिक्षकांच्या गाठी भेटी सुरू केल्या , बरेच दिवस शाळेपासून दूर असलेल्या बाळांच्या काळजीने व्यापलेल्या पालकांनी गराडा घातला आणि प्रश्नांचा भडीमार सुरू झाला , १० वी चे पालक प्रचंड चिंतेत दिसून आले .... मला क्षणभर वाटलं की नक्की मुलांची परीक्षा आहे की पालकांची ? का एव्हढी काळजी कशा साठी ? आपल्याच मुलांवर आपला विश्वास नाही का ? आपल्या पालकांची मानसिकता आठवा ... मग आपणच असे का वागतो ? आपली दिशा तरी कोणती ? ती योग्य की अयोग्य ? आपल्याला अपेक्षा तरी कोणत्या आहेत ? आणि मग सुरवात झाली आजच्या लेखाची.

            शिक्षण म्हटले की आपल्या समोर एक शिडी येते आणि त्या शिडीवर ओढाताण करणारी मुले , खालून त्यांना ओरडून चेतना देऊन आणखी वर आणखी वर असे पालक , तू करू शकतोस आणखी थोडे प्रयत्न कर , तू येथे चुकतो आहेस , आणखी थोड करायला पाहिजेस असे सांगणारे शिक्षक. तू बघ तो कसा आहे , किती करावे लागते ते बघ , तो बघ किती वेळ अभ्यास करतो आणि तू  ? असे म्हणून हिणवणार समाज.

          आपली मुले अभ्यास करत नाहीत , विचित्र वागतात ,  घरात आरडाओरडा करतात , दंग करतात , बाहेरच फिरतात शिस्त नावाचा प्रकार राहिला नाही, सारखे मोबाईल खेळतात  आपण सारेच ओरडतो , पण ती तशी का वागतात याचा जरतारी विचार आपण करतो का? त्यांच्या मनाचा विचार आपण कितीदा करतो ? अशी का वागतात ?  ...त्यांच्या मनाचा सारासार विचार ?   .... त्यांच्या मनात नक्की काय चालले आहे ? ... त्यांना नक्की काय पाहिजे आहे ? ... आपण आपल्याच मुलांना ... ज्यांना जन्म दिला त्यांना आपण ओळखले  आहे का ? ... नुसता अभ्यास करूनच तो मोठा होणार आहे का ? त्याला आपण किती माणुसकीची मूल्ये शिकवली ? आपण आपल्या मुलांना जे हवे आहे ते देतो की आपल्याला जे वाटते ते ? बर आपण त्यांना देताना आपली भावना काय असते ? माझ्या मते आपल्या आधीची जी पिढी आहे म्हणजे आपले वडील त्यांनी प्रचंड कष्ट करून आपले जीवन घडवलं आपणाला प्रत्येक गोष्ट त्यांनी देण्याचा प्रयत्न केला , पण सारेच मिळाले असेल असे नाही .... करणं पैसे कमी ... हे कारण आपल्या लक्षात आले ... आपल्या पालकां कडे पैसे कमी होते पण त्यांनी मोठ्या जिद्दीने आपल्याला घडवले ... जर आपण आपल्या कडे ... आपल्या अंतर मनाकडे जर काळजी पूर्वक पाहिले तर आपल्याला नक्की लक्षात येईल की आपल्याला त्यांनी एक लढवय्या , चांगला माणूस , आपल्या माणसावर प्राण पूर्वक प्रेम करणारा , चांगला मुलगा आणखी ब-याच खुबी असलेलं तयार केलं . मग आपल कुठे चुकलं ? ... आपण प्रचंड पैसा कमावला आणि कमवत पण आहोत , आपल्या मनात एव्हढच आहे की माझ्याकडे आज पैसे आहे माझ्या मुलांनी जे काही मागितलं ते लगेच त्यांना पुरवावे , जर विचार करा आपल्या पालकांना आपण मागितले ते कितीदा मागावे लागले ? आणि आपण ?.... मिळाले नाही असे नाही पण मिळाल्यावर त्याची किंमत होती , मग आपली मुलं अशी का वागतात? .

                जरा मागे वळून पाहू आपण जेव्हा शिक्षण घेत होते तेव्हा शिक्षकांनी रागावले किंवा मारले तर आपली हिम्मत नव्हती घरी सांगायची करणं सोपं आहे , जर घरी कळले तर शाळेतील मारा शिवाय घरी देखील प्रसाद मिळेल याची खात्री होती . मग जरा आजकडे पाहू आपल्या मुलांना नुसते शिक्षक रागावले  तरी बरेचसे पालक हे शाळेत जाऊन मोठ्या प्रमाणात वादावादी किंवा भांडणे करतात हे वास्तव आहे , कोणता ही शिक्षक मुलांचे नुकसान व्हावे म्हणून रागावत किंवा मारत नाही , आपण घरात त्याच मुलाला मारले , रागावले तर चालते मग शाळे बाबतीत आपण असे का वागतो ?जरा विचार करण्याची वेळ आहे . खरंच मला असं वाटत विचार करा. 

या पुढचा भाग नंतरच्या भागात पाहूया


                                             योगेश सतीश साने

                   



Comments

  1. सत्य परिस्थिती आहे पालकांनी घरातूनच संस्कार करणे गरजेचं आहे

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर , आपला संवाद असाच असावा , आणखी काही विषय असतील तरी कळवा.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

समास

मराठी भाषा म्हणजे .....

मराठी व्याकरण संधी व त्याचे प्रकार