Posts

समास

          मागील भागात आपण संधी पाहिले , संधीवर आधारित असा दुसरा प्रकार आपण पाहणार आहोत ज्याला 'समास '  असे म्हणतात .          माणसाला प्रत्येक गोष्ट वाचवून करायची सवय आहे , मग यात पैसे , वेळ किंवा आपले शब्द प्रत्येक ठिकाणी बचत करतोच . शब्दांच्या बाबती म्हणायचे झाले तर जोडशब्द तयार करून तो आपले शब्द वाचवतो .  उदा. सूर्य आणि उदय = सुर्येदय          याला संधी म्हणतात , काही वेळातर आपण एक , दोन किंवा अनेक शब्द गाळूनच नवीन शब्द तयार करतो . उदा. पाच वंडांचा समूह = पंचवटी ,  बटाटा घालून केलेला वडा = बटाटेवडा इत्यादी. समास: सम् +अस्   या संस्कृत धातू पासून तयार झाला आहे याचा अर्थ 'एकत्र करणे' असा होतो. असे तयार होणाऱ्या शब्दाला सामासिक शब्द असे म्हणतात , तर त्याची फोड केली की त्याला विग्रह म्हणतात. उदा. पोळपाट हा  सामासिक शब्द झाला तर पोळीसाठी पाट हा त्याचा विग्रह .         समासात किमान दोन शब्द एकत्र येतात , यांना पद असे म्हटले जाते , याच पदां वरून समास ठरत असतो. १)...

मराठी निबंध लेखन कसे करावे ?

        मागील भागात आपण मराठी निबंध याची व्याख्या व थोडी माहिती घेतली , आज आपण मराठी निबंध प्रकार व त्यांचे लेखन कसे करावे याची माहिती घेणार आहोत.        निबंधाला तसा ठराविक साचा नसतो , यात आपण आपल्या मनातले विचार प्रगट करत असतो किंवा आपल्या विचारांना चालना देत असतो . जेव्हा हे विचार आपण कागदावर उतरवतो त्याला निबंध असे म्हणतात.         निबंध लेखन आपण करताना चार महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत , ज्याच्या मदतीने आपले लेखन उत्तम होऊ शकेल.  १ . निरीक्षण : कोणतीही गोष्ट दिसली की थांबून पहाणे तिचा अनुभव घेणे , बारकावे टिपणे , आपल्या ज्ञानेंद्रियांना त्याची अनुभूती देणे  व निरीक्षण नोंदवून ठेवणे. २ . माहिती गोळा करणे : आपणा कडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून वाचन व लेखन , अनुभवी व्यक्ती , श्राव्य व दृक माध्यमे आणि आजच्या जीवनाचा अविभाज्य घटक इंटरनेटचे महाजल . ३ . योग्य नोंदी ठेवणे : घटनेची तारीख , वार , जागा , घटना क्रम , का ? कसे ? कोणी ? कधी ? कोणासाठी ? हे प्रश्न विचारावेत इंग्रजीत W / H चे प्रश्न यांच्या नोंदी ठेवाव...

मराठी निबंध व्याख्या व माहिती

       निबंध : =        निबंध या विषयाचे जर थोडक्यात विश्लेषण करायचे झाले तर गद्यलेखनाचा आधुनिक प्रकार असे म्हणता येईल. निबंध याला आपण 'एकत्र बांधणे' 'एकत्र रचणे' असे म्हटले तरी चालेल, आणि या मागचा इतिहास जर आपण पाहिला तर आपणास असे दिसून येत की पूर्वी लेखन भूर्जपत्रांवर केले जात असे आणि यांना एकत्रितपणे बांधून ठेवले जाई या लेखनात एकाच विषयाची माहिती संकलन असे , या रचनेला निबंध असे म्हणतात.         निबंध या आधी टिपणे व नंतर ग्रंथ असे म्हणता येईल , निबंधात आपल्याला आपलेच व समोरच्याचे समाधान करता येईल असे लेखन अपेक्षित आहे किंवा असे लेखन केलेले असावे .         निबंध लेखनातील एक प्रकार धर्मनिबंध यात हिंदू समाजातील लोकांनी कसे वागावे , त्याचा आचार कसा असावा , जर कोणते पाप घडले तर प्रायश्चित्त कसे घ्यावे , आपला व्यवहार कसा असावा या विषयाची माहिती किंवा विवेचन केलेले आपणास दिसून येते. कोणत्याही स्मृतिग्रंथावर केलेले भाष्य किंवा टीका देखील निबंधातच मोडली जाते.       डॉ.पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे या...

मराठी व्याकरण संधी व त्याचे प्रकार

  संधी :- व्याख्या व उदाहरणे. जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात .  संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात . संधी म्हणजे एक प्रकारची जोडाक्षरे होय . काही उदाहरणे पाहू . सूर्यास्त  =  सूर्य  +  अस्त ईश्र्वरेच्छा  =  ईश्र्वर  +  इच्छा संधीचे प्रामुख्याने 3(तीन) प्रकार पडतात ते आपण पाहू. १. स्वरसंधी २.व्यंजन संधी ३.विसर्गसंधी प्रथम आपण स्वरसंधी हा प्रकार पाहणार आहोत. स्वरसंधीचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात  १.दिर्घत्व   संधी   २.आदेश संधी आदेश संधीचे पुढे सहा प्रकार पडतात  क. गुणदेश संधी       ख. वृद्धयादेश संधी ग. यणादेश संधी       घ. विशेष आदेश संधी च. पूर्वरूप संधी        छ. पररूप संधी १.दिर्घत्व  संधी  :-   सजातीय र्‍हस्व किंवा दीर्घ स्वर मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला दीर्घत्व संधी म्हणतात . काही उदाहरणे. १. वृद...

याला कोण हो जबाबदार? (बाल मनाचा आचार आणि विचार)

         आजचा लेख लिहायला एक मजेदार कारण घडले या. आज एक पालक पालक सभेसाठी शाळेत आले होते , पालक सभा पार पडली आणि सर्वानीच शिक्षकांच्या गाठी भेटी सुरू केल्या , बरेच दिवस शाळेपासून दूर असलेल्या बाळांच्या काळजीने व्यापलेल्या पालकांनी गराडा घातला आणि प्रश्नांचा भडीमार सुरू झाला , १० वी चे पालक प्रचंड चिंतेत दिसून आले .... मला क्षणभर वाटलं की नक्की मुलांची परीक्षा आहे की पालकांची ? का एव्हढी काळजी कशा साठी ? आपल्याच मुलांवर आपला विश्वास नाही का ? आपल्या पालकांची मानसिकता आठवा ... मग आपणच असे का वागतो ? आपली दिशा तरी कोणती ? ती योग्य की अयोग्य ? आपल्याला अपेक्षा तरी कोणत्या आहेत ? आणि मग सुरवात झाली आजच्या लेखाची.             शिक्षण म्हटले की आपल्या समोर एक शिडी येते आणि त्या शिडीवर ओढाताण करणारी मुले , खालून त्यांना ओरडून चेतना देऊन आणखी वर आणखी वर असे पालक , तू करू शकतोस आणखी थोडे प्रयत्न कर , तू येथे चुकतो आहेस , आणखी थोड करायला पाहिजेस असे सांगणारे शिक्षक. तू बघ तो कसा आहे , किती करावे लागते ते बघ , तो बघ किती वेळ अभ्यास करतो आणि तू...

मराठीचा वर्णनात्मक परिचय ...

 मराठीचा वर्णनात्मक परिचय  या भागात आपण आज चार विषयाचा समावेश करणार आहोत. १)ध्वनी विचार           (अ) स्वर  उच्च  (संवृत)       पूर्व    इ    मध्य    ...      पश्च (शेेेवट)  उ मध्य (अर्ध विवृत) पूर्व    ए     मध्य    अ     पश्च (शेेेवट)   ओ निम्न (विवृत)       पूर्व    अँ    मध्य  आ    पश्च (शेेेवट)   आँ -हस्व स्वर यांना स्वर आवधियुक्त देखील म्हटले जाते. जे स्वर मोठ्यांदा उच्चारले जातात त्यांना आघातयुक्त   म्हणतात . अनुनासिक शब्द  हे नाकाच्या पोकळीतून नादासह उच्चारलेेले .         (आ) व्यंजन  क् , ख् , ग् .....  ही व्यंजने आहेत . आता त्यांचे प्रकार पाहू. १) ओष्ठ्य : प , फ , ब , भ (स्फोटक) , म,म्ह (नासिका) , व , व्ह (अर्धस्वर) . २) दंत्य : त , थ , द , ध (स्फोटक) , स (घर्षक) , न , न्ह (नासिका) , ल , ल्ह (पाश्चिक) ...

मराठी भाषा म्हणजे .....

       भाषा म्हटले की आपल्याला आठवते आपली मायबोली जी मराठी आहे, मग भाषा म्हणजे काय ? भाषा नक्की काय असते ? तर माझ्या मते भाषेचा अर्थच मुळी 'नुसती बोलली जाणारी' असा असावा . करण असे की ,अनेक समाज असे आहेत की ज्यांना बोली भाषा आहे पण त्यांना लिपी नाहीच म्हणजे त्यांच्या भाषेला लिखाण लिपी नाही , तरी देखील त्याला देखील भाषा असेच म्हणता येईल , करण त्यातील साहित्य लेखी स्वरूपात नसले तरी तोंडातून उमटणाऱ्या ध्वनी म्हणजेच तोंडी साहित्यच आहे.             भाषा जरी एकाच नावाने ओळखली जात असली तरी तिचे स्वरूप हे मात्र विविधता पूर्ण आहे . उदा. जसे आपण मराठी भाषा घेतली तर तिच्या अनेक पोट भाषा आहेत सांगायचे झाले तर कोकणी , वऱ्हाडी , खानदेश , कोल्हापुरी ,मालावणी  हे पोट प्रकार त्या ठिकाणी असणारा भौगोलिक प्रदेश , परिस्थितीत , आजूबाजूला असणारी राज्ये ,असणारे समाज , पंथ यावर अवलंबून असते .             भाषेच्या अंगी सर्वात महत्वाचा गुण म्हणजे परिवर्तन शिलता याला मराठीत एक सुंदर नाव आहे ' शब्दसिद्धी ' . म्हणजे थोडक्यात सांगायचे...